मी सांगीतलेले काम करायला रानबा पुढे कामाला लागेल असे वाटले किंबहुना बिघडेल हे मनात आलेच नव्ह्ते. रानबाचा रोजचा परिपाठ बिनातक्रार काम पुर्ण करण्याचा होता. दिलेले काम काळजीपुर्वक करुन त्याचा रिपोर्ट दिल्याशिवाय रानबा घरी जात नव्ह्ता. "मी त्ये करनार नाय" हा त्याचा आजचा पवित्रा मला अगदी नवीन होता. माझ्या सवयीप्रमाणे मी दबाव टाकताच रानबा "तुमी मला वंगाळ काम देता म्हणुन माझ वाटुळ झाल" म्हणुन धाय मोकलुन रडु लागला. रानबाचा वारस खाजगी उद्योगात सुपरवायझरची आज्ञा टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान. त्यातुन रानबा साधा हेल्पर. हा माझ्या आदेशाची वासलात लावत असेल तर उद्या माझे कोण ऐकणार याविचाराने मी संतापलो होतो. माझ्या डोळ्यातल्या ठिणग्या व रानबाची अगतीकता पाहुन मामा पुढे आला. " साहेब हे काम या आठवड्यात पुर्ण करण्याची जबाबदारी माझी. उद्या शांताराम आला म्हणजे मी त्याला घेऊन हे काम पुर्ण करेन. आज मला आणि रानबाला दुसरे काम द्या." मामा आमच्या मेन्टेनंस विभागातला सर्वात जुना कामगार त्यातुन सुरवातीच्या काळात मला कामाचे प्रशिक्षण दिलेले या नात्याने मी त्याचे ऐकत असे. ...
Marathi Katha, Police Katha, Bhut Katha, Rahasya Katha, Samajik Katha, Devnagri Marathi Katha,