तो मुळचा कुठला, त्याच खर नाव काय गावात कुणालाच माहित नव्ह्त. आमच्या शंभर उंबर्यांच्या गावात हे शोधायाची आवश्यकता कधी कुणाला वाटली नाही. कुणी विचारलही असेल त्याला, पण तो माणसांच्या दुनियेत रहाणारा नव्ह्ता. भुक लागली की कुणाच्याही दरवाज्यात येऊन म्हणे " माय खायला दे " मग याला नाहीतर त्याला ज्याला लक्षात येई तो खायला वाढी. देवळाच्या ओसरीवर रात्री स्वारी आडवी होई. दिवाळी शिमग्याला कोणी देईल ते कपडे अंगावर चढवी. कायम अर्धी चड्डी आणि साधारण कोपरी सारखा सदरा हा त्याचा वेष. इतक असुन रोज अंघोळ मात्र नेमाने करी. वेडा माणसांशी फारसा बोलत नसे. पण मुके प्राणी त्याच्या आवडीचा विषय. गाभण गाईकडे पाहुन तीला म्हणे " होशील बर मोकळी दोन दिसात" त्याचा हा अभ्यास त्याला जगण्याचे साधन पुरवी. प्राण्यांचे रोग तो पटकन ओळखी. यातुन गावच्या लोकांना त्याची मदत होई. मी जेव्हा दहावी नतरच्या सुट्टीत दापोलीला आजोळी गेलो तेव्हा वेड्याची, त्याच्या खर्या नावाची, तो कुठुन आला याची विचारणा आजी आजोबा सगळ्यांकडे केली. जेव्हा फारसे कोणी सांगु शकले नाही तेव्हा मग वेड्यालाच विचारायचे ठरवले. एक दिवस दुप...
Marathi Katha, Police Katha, Bhut Katha, Rahasya Katha, Samajik Katha, Devnagri Marathi Katha,